सुट्यांमध्ये काही तरी चांगला वाचव असा माझा मानस होता, पण चांगल म्हणजे काय?
पु. लं ची पुस्तक वाचावी कि व. पुं ची ? अचानक मला एका ग्रंथाची आठवण झाली. अनेक वर्षांपूर्वी आईने आणलेला दासबोध वाचावा अशी इच्छा झाली. एका Software Engineer ला दासबोधातून काय काय बोध मिळू शकतात, हि माझी उत्सुकता होती. फटकन google वर Dasbodh marathi download सर्च केला आणि pdf download केली.
ग्रंथाच्या सुरुवातीला पूर्ण ग्रंथातील विषयांची विभागणी सांगितली आहे. ह्यात एकूण २० दशक आहेत आणि प्रत्येक दशकात १० समास आहेत. हा blog एक experiment आहे जसा जसा मी एक एक विभाग वाचत जाईल तसा तसा त्यातून मला कळलेला भावार्थ मी लिहित जाईल. आजच्या जगात दासबोध आणि त्यातील तत्वे कितपत लागू करता येतात हा माझ्या अभ्यासाचा प्रयत्न राहील. दासबोधवर कोणत्याही प्रकारची टीका करण्याचा माझा हेतू नव्हे हे वाचकांना माझे नम्र अनुमोदन.
पहिल्या समासात रामदासांनी ग्रंथ का आणि कोणी वाचवा याबद्दल लिहिला आहे. मोक्षप्राप्ती साठी, जीव शिवाचा अर्थ समजण्यासाठी. ग्रंथ न वाचता त्यावर टीका करू नये असा उपदेश देखील समर्थांनी त्यात केला आहे.
आजच्या युगात…छे युगात म्हणण्यापेक्षा आजच्या परिस्थितीत rather context मध्ये मोक्षप्राप्तीच्या काय अर्थ असावा? आपला मुलभूत प्रश्न. या जगात आपल्या उत्पत्तीचा काय मूळ हेतू? Why are we here?? निसर्गाच्या त्या रूपाशी आपल्या कृती कशा जुळलेल्या आहेत?? आजकाल एक trend पाहण्यात येतो की लोकांना आपले मत मांडण्याची भलतीच घाई असते. अनेक लोक ग्रंथ न वाचताच त्याचा अनादर करण्यास सज्ज असतात. असा approach टाळावा असा समर्थांनी इशारा केला आहे.
दुसऱ्या समासात समर्थांनी गणेशस्तवन केला आहे. समर्थांनी गणपतीची जी स्तुती केली आहे ती खरच वाचण्यासारखी आहे. गणपतीच्या प्रत्येक अवयवाच वर्णन, आणि त्यातून त्याची स्वभाव वैशिष्ठे काय अप्रतिम मांडली आहेत. मग त्याच लठ्ठ पोट म्हणा कि मुरडलेली सोंड, त्याचे सुपासारखे कान, भव्य कपाळ, गळ्यातल्या माळा किंवा पितांबर. त्याचा अति उत्साही स्वभाव असो कि नृत्य कौशल्य. आपल्या संस्कृतीत गणेशाचा स्थवन करतात जेणेकरून तो सद्बुद्धि देतो आणि विघ्न टाळतो.
पुन्हा आजच्या युगात…गणपतीचे अवयव हे खरतर दर्शवतात कि आपण आपल्यात कोणत्या वृत्ती आणाव्या. सुपासारखे कान म्हणजे constant vigilance सतर्कपणा. त्याचे लठ्ठ पोट म्हणजे जितकं knowledge मिळवता येते तितक मिळवाव अशी उपमा. त्याची चपळता म्हणजे नवनवीन गोष्टींना, विचारांना adapt करून घेण्याची वृत्ती.
तिसऱ्या समासा समार्थांनी शारदा स्तवन केले आहे अर्थात सरस्वतीची स्तुति.
आजच्या युगात सरस्वतीची पूजा म्हणजे भाषा प्राविण्य, वक्तृत्व, कला प्राविण्य. multilingual असणे हे आजच्या युगातील advantage आहे. तुम्ही वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांशी बोलू शकता, त्यांचे मत, विचार समजू शकता, स्वतः चे विचार मांडू शकता.
चौथ्या समासात समर्थांनी सद्गुरूची स्तुती केली आहे. सद्गुरु रुपाची सागर, पर्वत, आकाश, पृथ्वी, सुर्य, अमृत अशा अनेक तत्वांशी तुलना केली आणि प्रत्येक तत्वाहूनही सद्गुरूला श्रेठ दर्जा दिला.
आजच्या युगात सद्गुरु म्हणजे आपल्या आयुष्यातील तो घटक जो आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतो, सद्बुद्धि देतो. गुरु आणि सद्गुरु मध्ये एकाच फरक असावा, गुरु हा विषयाचे ध्यान देतो तर सद्गुरु हा तत्वध्यान देतो. आयुष्यातील ध्येयाप्रती जागृत ठेवतो.
पाचवा अध्याय संतांची स्तुती गातो. ज्यांना परब्रम्हाचे ज्ञान आहे, वेदांचा खरा अर्थ माहित आहे आणि त्यांची अधिकारवाणी त्यांच्या वर्तनातून श्रेष्ठ बनत जाते असे ते सन्त.
भारताला अनेक संतांचे पाऊल लागले आहेत. मग ते गजानन महाराज असो अथवा साई बाबा असोत. संत हे सामाजिक प्रगतीचे, लोकांची मानसिकता चांगल्या बाजूने झुकावण्यास मदत करतात.
कोणत्याही भाषणामध्ये जितका महत्वाचा वक्ता तितकाच महत्वाचा असतो श्रोता. प्रतिभावंत श्रोता हा विषयाशी जवळ असतो आणि वक्त्याचे सर्व statements पडताळतो. उगीचच कोणी वक्ता मोठा आहे म्हणून तो म्हणतो तेच सत्य असा खऱ्या श्रोत्याचा approach कधीच नसतो. वक्ता आणि श्रोता यांच्या वाद्विवादातूनच विचारांची देवाणघेवाण होते आणि विषय प्रगल्भ होतो.
हा blog प्रचंड अध्यात्मिक होऊन राहिला आहे!!!
Hadoop technology वर seminar ऐकायला गेलेल्याला जर hadoop चा ह पण माहित नसेल तर वक्त्याची speech seminar कमी आणि बकबक जास्त वाटेल हा मतितार्थ. अश्या गुणी आणि ज्ञानि श्रोत्यांची acknowledgement समर्थांनी सहाव्या अध्यायात केली आहे.
सातव्या अध्यायात कवींचे स्तवन केले आहे. आता कवींना इतका आदर का? कारण जुन्या काळात कोणताही ग्रंथ असो तो mostly काव्याच्या रूपातच लिहिला जात असे. बरोबर आहे न? कारण त्या काळात लोक गद्या पेक्षा पद्यालाच जास्त आपले मनात असत. म्हणून ज्ञानेश्वरी असो की तुकारामपुराण, सर्व काही कवितां मधेच. वेगवेगळे शब्द वाचून, rhyming patterns बनवून कविता रचणे हि पण एक कलाच.
आज जर कोणाला ह्या context मध्ये आदर द्यायचा असेल तर जे वेगवेगळ्या social /political /technological गोष्टींवर blog लिहितात अश्या bloggers ला नाहीतर लेखकांना द्यावा लागेल.
आजून तीन अध्याय राहिले आहेत म्हणजे तीन entities चे 'स्तवन' राहिले आहे. हुश्श, पूर्ण पहिला समास हा actually कोणत्याही पुस्तकातील acknowledgements page सारखा आहे. मला थोडासा कंटाळा येत आहे. अरे यार, main दासबोध केव्हा चालू होईल?? हे तर असा झालाय कि Avengers पाहायला गेलो आणि hulk, ironman दिसताच नहित. पण लक्षात ठेवा, picture अभी बाकी ही मेरे दोस्त !!!